नीज न ये तर गीत म्हणावे।
अथवा झोके देत वसावे।।।
कोण करी हे जीवे भावे।
ती माझी आई........।।।
रडवे माझे वदन वघोनी
भूक लागली हे जाणोनी।
कोण उगे करी मज पाजोनी
ती माझी आई......।।।
हसता मजला पाहुनी हसते,
मुके मटामट कितीतरी घेते..।
परी अन्तरी जी त्रुप्त न होते,
ती माझी आई............।।।
चालत असता पडलो पाहुनी,
उचलाया मज येई धाउनी..।
गोन्जारी पोटाशी धरुनी
ती माझी आई..........।।।
स्मरण तुझ्या ममतेचे होई,
तव उपकारा सीमा नाही ,
कैसा होऊ मी उतराई..।।
गे माझी आई........।।।
...............00000...............

लोड होत आहे...
प्रतिसाद