एक मराठी कविता.शाळेत शिकलेली.
एका कोळ्य़ाचा प्रयत्न
एका कोळिय़ाने एकदा आपुले जाळे बान्धिय़ेले ऊन्च जागी
तेथुनि सुखाने खालती तो आला परि मग झाला कष्टी बहू
मागुति जाळिया माजि जाता य़ेना धाग्य़ावरुनि पुन्हा पुन्हा पडे
चार वेळ तो ह्या परि पडे जाय बापुडा भागुनि पुढे
आस खुन्टली येतसे रडे आन्ग टाकुनी भूमिसी पडे
फिरुनि एकदा धीर घरुनिया लागे हळुहळु वरती चढाया
परि जाळ्यमघि शिरताना तो झोक जाउनी पडला
पाचहि वेळा यत्न करुनिया आले यश न तयाला
गरिब बापुडा कोळी तेव्हा दुक्खि अतिशय झाला
हिम्मत धरुनि फिरुनि आणखि धागा चढुनि गेला
परि जाळ्यामधि शिरताना तो झोक जाऊनि पडला
अहा मज ऐसा दैवहत प्राणी
खचित जगतीया दिसतनसे कोणी
निराशेने बोलुनी असे गेला
परि चित्ति स्वस्थता नये त्याला
मग वेगे वेगे ऊठे धागा चढु लागे नेटे
बहु घेई खबरदारि जाई पोचे जाळ्यावरी
हळुच मग आत शिरे पोटी आनन्दाने भरी
झटे निश्चयाचे बळे अन्ति त्याला यश मिळे
निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ
--------------------00-------------------------

लोड होत आहे...
प्रतिसाद