Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

हदगा

लहानपणची एक आठवण


मी शाळेत असताना आम्ही प्रथम हा सण साजरा केला होता. आमच्या बाईनीच तो करविला होता. हल्ली हा साजरा होतो कि नाही काही कल्पना नाही. एक मजेदार सण आहे. ' हदगा देव मी पूजिते सख्याना बोलविते हदगा देव मी पूजिते ' अशी सुरुवात करतो. ह्यावेळी हदग्याच्या फुलाना बहर येतो. ही फुले फार सुंदर असतात. लाम्ब देठ असतात चार पाकळ्या गुलाबी किवा पांढर्या. मंद मधुर सुगंद असतो. लाम्ब देठामुळे त्याची छान वेणी बनऊन सुंदर हार बनविता येतो. मुली एकत्र येऊन फेर धरतात मध्यस्थानी एका पाटावर रांगोळी घालून गणेशाची मूर्ती ठेऊन हदग्यांच्या फुलांच्या हाराने सजवितात. फेर धरून मुली गाणे म्हणतात ही गाणीच फार मजेदार असतात. काही स्त्रिया त्यात्यावेळी गाणी रचतात. त्या गाण्यात वाटेल ते शब्द हवे तसे रचलेले असतात म्हणूनच त्याची मजा वाटते गाणी अशी :;-
उदा:- ऐलमा पैलमा गणेश देवा..... माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा.....
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी ... पार्वळ घुम्मर गिरिजावरी ...
गिरिजावरी फकीराचे आम्ब्यावानी डोळे ...
आम्ब्यावानी डोळ्याच्या सार्विल टिक्का ... आमच्या गावच्या भुलोनी नायिका
एवि निघा तेवि निघा कांदा तिळू बाई तांदुळ घ्या
आउक्श देरे भमाळी ....
माळी गेला शेता भाता .... पाऊस पडला येता जाता...
पड पड पाऊसा थेम्बा थेम्बी .. थेम्बा थेम्बीच्या आळ्या लोम्बी...
आळ्या लोम्बती अंगणा
अंगणा तुझी सात वर्ष ... हदग्या तुझी सोळा वर्ष.
--------
आणखी एक मजेदार गाण.....
एक लिम्बु झेलु बाई दोन लिम्बु झेलु ... दोन लिम्बू झेलु बाई तीन लिम्बु ......अश्या रितिने पाच लिम्बू पर्यत म्हणून मग ...... पाच लिम्बु पाणवटा .. माळ घाली हनुमंता ... हनुमन्ताची निळी घोडी .. येता जाता कमळ तोडी ... कमळाच्या पाठीमागे होती राणी.... अग अग राणी इथ कुठ पाणी ... पाणी नव्हे यमुना जमुना ...
यमुना जमुनाची बारिक वाळू ... चिराच्या बाळूला भूक लागली ... पाटलाच्या गड्याने दुध पाजल ...गोवार्याच्या शिम्प्याने तोंड पुसल ............ मग पुन्हा आउक्श देरे भमाळी वगैरे....
आणि शेवटी हदग्या तुझी सोळा वर्ष म्हणून सगळीजण मोकळी होतात
नंतर खिरापत वाटणे ......... सग्ळ्या आपापल्या घरून काहीतरी पदार्थ आणायचे व ते ओळखायचे. आणि मग एकमेकाना ते वाटायचे. खूप मजा यायची. मे बिजापुर सोडल्यानंतर (1943) ह्या सणाबद्दल अद्याप काहीही कळले नाही.
त्याची आठवणच फार छान वाटते मला ह्या गाण्याचे सर्व शब्द व पूर्ण गाणी मराठी साहित्यात पारम्परिक संगीतात मिळाले भोडल्याची गाणी ह्या सदरात . लहानपणी कसतरी पाठ केलेल परवा मी मरठी साहित्य चाळत असताना मिळाले.

नकार