Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

एक जुन गाण


माझ्या ताईला शिकवायला गायन मास्तर घरी यायचे त्यावेळी तिला शिकविलेल गाण आम्हा सर्वाना येत असे वडिलाना संगीताची आवड होतीच ते पण ते गाण म्हणत होते ते गाण मला चांगल आठवत. एकदा काही वर्षापूर्वी आशा भोसले यांची रेकोर्ड ऐकल्याच आठवतय ते गाण मी लिहिण्याचा प्रयत्न करते.
श्रीक्रुष्णाच वर्णन आहे.......

अगणित सुरगण वर्णिती ज्यांच्या
कटी कर नटसम चरण विटेवरी
ऊभे राहिले... हरी ऊभे राहिले .... विठु ऊभे राहिले... अगणित सुर गण ...

चोख्या माळ्याची भाजी विकली
कबीराचे शेले विणले
गोरा कुम्भारचे बाळ रक्शिले..
शिकली तुडविता ... हरीने शिकली तुडविता ... विठूने शिकली तुडविता .. अगणित सुरगण....

चोख्यासंगे दोरी ओढिता ..
शिणला नाही तो तत्वत्ता ...
जनाबाई संगे दळिता कांडिता...
गाणे गायिले ... हरीने गाणे गायीले .... विठूने गाणे गायिले... अगणित सिरगण...

दामाजीची रसिद भरली..
कान्होपात्रा मुक्ति दिधली...
अम्रुत राय म्हणे ऐसी माउली
संकटे वाहिली ... हरीने संकटे वाहिली .... विठूने संकटे वाहिली
अगणित सुरगण वर्णिती ज्यांचा .. कटि कर नट सम चरण विटेवरी ... ऊभे राहिले हरी ऊभे राहिले
विठू ऊभे ... राहिले...

प्रतिसाद

Re: एक जुन गाण
प्रिय शारदा, हे गाणं खरंच छान !! आण्णांची आठवण झाली. आणि खूप बरं वाटलं ! तुझा हा संग्रह अगदी वाखाणण्याजोगा आहे. ' सदोदित राम स्मरावा राम' हे गाणं आठवतं कां? मला फक्त एकच ओळ आठवते. अनिल
Re: एक जुन गाण
Re: एक जुन गाण
Re: एक जुन गाण
नकार