शांता आपटे ... निरुताई व वासंती घोरपडे आक्का ह्या दोघींच बरच सूत जमलेल. आक्का निरूताईला रुतुच वर्णन करणारे गाणे म्हणून नाच करून दाखविते. तालाची संगत ताम्ब्याभाण्ड्याने निरूताई करते. खूप छान वाटत शांता आपटे नऊ वारी साडी ओचा कासोटा घालून नेसलेली व सुरेकसा आम्बाडा घातलेला किती छान दिसते. आणि वासंती एक साध परकर पोलक घातलेली ती पण किती छान दिसते. तर ते गाण .... भारती स्रुष्टीचे.
भारती स्रुष्टीचे सौंदर्य खेळे ... दावित सतत रूप आगळे... भारती स्रुष्टीचे.....
वसंत वनात जनात हासे .. स्रुष्टी देवी जणू नाचे उल्हासे....
गातात संगीत प्रुथ्वीचे भाट ... चैत्र वैशाखाचा ऐसा हा थाट .... भारती स्रुष्टीचे सौंदर्य..
ज्येष्ट आषाडात मेघांची दाटी.. कडाडेच्यापला होतसे व्रुष्टी ..
घालाया स्रुष्टीला मंगल स्नान .. पूर अम्रुताचा सांडे वरून
गगनी नर्तन क्रुष्ण मेघांचे ... भूतली मयुर उत्तान नाचे ........ भारती स्रुष्टीचे सौंदर्य. ...
श्रावणी पाऊस हर्षाचा पडे ... श्रीक्रुष्ण जन्माची दगल ऊडे....
बांधीती व्रुक्शाना रम्य हिंदोळे ... कामिनी ध्ररणी वैभवी लोळे . भारती स्रुष्टीचे सौंदर्य ....
--------00000......--- .
अहा भारत विराजे .. जगा दिपवित तेजे .... अहा भारत विराजे...
भादव्यात येती गौरी गणपती उत्सवा येयी बहार
मेळे आरास करोनी गाती हासोनी नाचोनी
ध्वनी त्यात निनादे ... अहा भारत विराजे
.
नवरात्र पूजेची अश्विन शोभा ... करित नारी श्रुंगार..
लेऊनी वसने मजेदार ... गळा विविध अलंकार..
ध्वनी त्यातुन निनादे ... अहा भारत विराजे..
आली दिवाळी भूवन उजळी ... आनंद घे अवतार
दिपक नभिचे भूवरी येती .. दाविती शोभा अपार
मुदित ह्रुदयी सजती करित ... सकल जन विहार
माला तोरणे फुलांची .. वसने भुशणे जनांची ..
.
शोभा पाहुनी धरेची मनी स्वर्गही लाजे .. अहा भारत विराजे ...
लोड होत आहे...