ही कविता आमच्या पाठ्य पुस्तकातली. तिसरी किवा चौथीत असताना मराठी पाठ्यपुस्तकात आम्हाला होती. कवितेला चाल लावता येत असे त्यामुळे पाठांतर सहज होत असे लहानपणी पाठ केलेल असल तर ते लक्शात राहात. तीच कविता मी लिहीत आहे . त्यावेळी जरी त्याचा अर्थ समजला नसला तरी आता म्हणताना फारच छान वाटते. सकाळच वर्णन आहे पक्श्याचे मंजूळ गाणे... सूर्योदय होतो वा सकाळचे विविध कार्यांची सुरुवात हे सर्व फार छान वाटत.... कविता .... | प्रभात वर्णन |
झाडी तुनी हे उडुनी प्रभाती .. पक्शी कसे मंजुळ शब्द गाती. ...
नेमेची येतो उदया रवी तो, या कारणे मोद तयासि होतो. ...
p>
उमाठ्यावरी येतसे सूर्य जेव्हा \
नभी होतसे चंद्र निस्तेज तेव्हा \\
प्रकाशामुळे लोपती सर्व तारा ..|
मिळेना कुठे टाव त्या अंधकारा . ||
वरी बिम्ब ते लाल आले विशाल |
जणू तापलेला उठे लोह गोल. ||
तरूंच्या शिरी रंग येई मजेचा |
मुलामा दिला काय तो सोनियाचा.. ||
खाली वरी हा पसरे प्रकाश |
चोहीकडे तो करितो प्रवेश ||
कोल्हे तसे चोर वनी दडाले |
कामे करू सज्जन हे निघाले ||
कुणी स्नान आटोपुनी स्वच्छ होती.. |
कुणी ईश्वरा वंदुनी प्रार्थिताती ||
कुणी पुस्तके काढुनी वाचितात
मुलाना कुणी पाठही सांगतात.. \\
कुणी औत हाकूनी शेतास नेती .. |
कुणी धार काढावया लागताती .. ||
कुणी सोडुनी नेती गाई चराया .. |
असे लागले लोक कामे कराया.. \\
सुटे मंद वारा डुले सर्व रान .. |
दिसे जीव आला भरे अंगी जोम |\
करायास कामे मना हौस वाटे .. |
प्रभाती असा फार आनंद दाटे.. |\
============ 0000 =============

लोड होत आहे...