Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

घोडके नकलाकार

बिजापुरात असताना बाल गंधर्वांची नाटक कम्पनी आली होती काही नाटके चालली होती
बाल गंधर्व स्वत स्त्री पार्ट करीत असत त्या काळी स्त्रिया नाटकात काम करीत नसत
तर घोड्के यानी हुबेहुब बाल गंधर्वांची नक्कल केली होती . बाल गंधर्वाना स्त्रीची भुमिका
अतिशय शोभत होती घोडके पण तसेच दिसत होते मला बाल गंधर्वांच एक गाण
आठवतय ते मी लिहिण्याचा इथे प्रयत्न करते . घोडके बाल गंधर्वांसारखेच दिसत होतेच त्यानी गंधर्वांसारखीच वेष भूषापण केली होती नऊ वारी लुगडे ओचा कासोटा घातलेला सुरेखसा आम्बाडा त्यावर एखादे फूल किवा फुलांची वेणी वेळेनुसार नाकात नथ. मोठ्ठ कुंकू घोडके ह्यावेषात बाल गंधर्वा सारखेच दिसत आणि त्यांच्यासारखेच चालून व नटून मुरडून दाखवीत असत.‍ आम्हाला खूप मजा वाटायची .
बाल गंधर्वांच ते गाण .......
डोळे हे जुल्मी गडे ... रोकुनी मज पाहु नका....
रोकुनी मज पाहु नका.
बोचे सुई फिर फिरुनी .. आग उगा लाऊ नका
आग उगा लाऊ नका. ....
कशिदा मी काढू कशी ... त्यात होती फार चुका..
त्यात होती फार चुका...
खळ बळ किती होय मनी .. जमतिल त्या सर्व जणी ...
हसतिल त्या संधी बघुनी .. येथे उभे राहू नका
येथे उभे राहू नका. ... .... डोळे हे जुल्मी गडे
रोकुनी मज पाहू नका... |||
य्हाची नक्कल व" नाही मी बोलत नाथा " अगदी बाल गंधर्वच जणु.
आणि घोडके यांचच एक मजेदार गाण ...कष्याची नक्कल माहित नाही.
ते गाण अस आहे.
दगड गड्गडत पडले पडले .... दोन दगड गडगडत पडले पडले
ध ध ध ध.. गडगडत पडले पडले ...

एकविस निम्मे साडे धा (दहा) बावीस निम्मे अकरा ...
बे पंचे धा धा .. चार अडिच धा धा ...
धा धा धा धा ... गडगडत पड्ले पडले .. दोन दगड गडगडत पडले
हे म्हणून पाहिल्यास खूप मजा वाटेल टंग ट्विस्टर प्रेक्षकाना हसून हसून पुरे वाट व्हायची . अशी होती लहानपणची एक मजेदार आठवण
--------------------------


नकार