Webdunia: Portal - Search - Mail - Greetings   More >>
Support | Font Download | Feedback
Search  
Welcome, Guest  [ Register | Sign In ]

नरसोबाच्या देवळातील पालखी


बिजापुरात एक दत्ताचे देऊल आहे. त्याला गावात नरसोबाचे देऊळ असच म्हणत . त्या देवळात दत्त जयंतीला मोठ्ठा उत्सव असतो. मोठ्ठी पालखी . प्रदक्शिणा करतात. पुष्कळ जण पालखी खाली निजतात. प्रदक्शिणा घालताना. भक्ती गीते म्हणतात. मला एक गीत आठवले ते मी इथे लिहीत आहे.
वास्तविक मला ते पूर्ण आठवत नव्हत . पण मला ते पूर्ण गीत एका तमिळ भजन पुस्तकातून मिळाले. हो मी तामिळ वाचू शकते. आम्ही घरी तमिळ मराठी आणि हिंदी भाशा बोलतो त्याविशयी मी कधीतरी लिहीन.
तर ते पालखीच गाण " धन्य धन्य हो प्रदक्शिणा "...

धन्य धन्य हो प्रदक्शिणा सद्गुरु रायाची ..
सद्गुरु रायाची, माझे श्री गुरु रायाची... धन्य धन्य हो प्रदक्शिणा ...

झाली त्वरा सुरवरा, विमान उतरायाची... धन्य धन्य हो...

पदोपदी अपार झाल्या , पुण्ण्याच्या राशी..
सर्वही तीर्थे घडली आम्हा , आधी करूनी काशी.. धन्य धन्य..

म्रुदंग, टाळ डोले भक्त भावार्थे गाती...
नाम संकीर्तन नित्य आनंदे नाचती... ... ...धन्य धन्य

कोटी ब्रम्ह धाम हरिती .. करिता दंडवत...
लोटांगण घालित , मोक्ष लागे पायांस... ...... धन्य धन्य ..

गुरु भजनाचा महिमा न कळे , आगम निगमासी..
अनुभवते जाणती जे गुरुपदीचे रहिवासी.. .... धन्य धन्य ..


प्रदक्षिणा करुनी देहे भावे वाहिला..
श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला.. धन्य धन्य हो प्रदक्षिणा ....|||
------------------ 000000000 --------------
त्यानंतर काही जणानी हे गाणे म्हंटले. अर्थ पूर्ण गाण
अपुल्या आपण वैरी झाला मानव ह्या संसारी ... अपुल्या आपण वैरी
गाढ अविद्या मदिरा पिऊनी , शिरी मद चढला भारी ..
झाला मानव ह्या संसारी अपुल्या आपण वैरी ... |||
====== 000000 ======
त्यानंतर ईतरही ज्याना गाणी म्हणायची असतील तर म्हणत व मग सर्वाना जेवण दिले जाते.
फार छान वाटायच. आता कस काय आहे याची किंचितही कल्पना नाही. कितितरी वर्ष लोटली.
पण जुन्या आठवणी फार छान वाटतात.
----------------------


नकार