आम्ही लहान असताना रेडिओ वगैरे नव्हता. आमच्याकडे ग्रामफोन असायचा. रेकार्ड्सअसायचे. मोठ मोठ्या गायकांचे रेकार्डस असायचे. उस्ताद अब्दुल करीम खान्, बडे गुलाम अलि , हिराबाई बडोदेकर वगैरेंच्या उत्तम गाण्याच्या रेकार्ड्स होत्या. तसेच काही त्यावेळेच्या चित्रपटांच्याही रेकार्ड्स . व एक दोन लहान लहान नाटिका होत्या किसरूळचा शेतकरी ह्या छोट्याश्या पोवाड्यासारखी एक रेकार्ड होती. ती मला पूर्ण आठवते. मी ते लिहिण्याचा प्रयत्न करते. आहे मजेदारच
किसरूळ्चा शेतकरी.
----------------------
किसरूळ हे कोल्हापूर झिल्ह्याच खेडगाव आहे. शेतकरी शेतात काम करून दुपारच्या जेवणाकरीता आपल काम थाम्बवून एकत्र जमून थोडी विश्रांती घेतात तेव्हा एक शेतकरी सुचवतो. ह्यावळी वेळ घलवण्या करीता एक पोवडा होऊन जाऊदे अस म्हणता ऐका तर....
टण टण टण टण ... टणण ण ण .... हो
अर जी जी र जी अर जी जी रजी
अॅरे किसरूळ खेडगाव कोल्हापूर जिल्ह्याला ...
सह्याद्रिच्या डोंगरची रहाणी , नदीच पाणी
है त्या गाकाला ,.... आ र र र र आ हा जी जी र जी
जंगलात हुर्डा . करवंद झाडी लै दाट
गावात फणाचा आम्बा केळीची शोभाची वारिती भेट
हा र र र हा हा जी जी र जी ......
एक शेतकरी सरग्या भला ...
कामिना मैना संगतीला ..
शिरपती मुलगा एक त्याला
नान्दतो श्यात पिकऊन मोठ्या कष्टान त्याच गावाला
हा र र ...र र... र माझ्या मैने तुला हा हा जी जी ग जी ....
इतक्यात एक शेळी ब बे करीत धावते. आणि शिरप्या येतो ओरडत. ...
" बाबा, ए बाबा घरिया चलकी आईन भाकरी केली हाय. "
" बर बर येतोच मी औत सोडून तू हो म्होर "
दोघ घरी येतात. .....
" ये आये , बाबा आला आता वाढ कि मला भाकरी "
" ऊन पन काय लागतय बघ, कारभारणी ,"
" आ...ईए मला अजून जरा डांगर वाढ की "
डांगर सम्पल ..कोर्ड्या संग लाऊन लाऊन खा..की त्यो काय भात है हो कार्ट्या शिर्प्या ?" ' हा.... "
" कारभारणी " ..... " हो काय म्हणता? आऊंदा पिक पाणी चांगल आलय नव्ह?
" अग , आऊंद्याच्या पिकाला नाव कोण ठेविल!! चांगल सोळा आणे पीक आलय बघ"
" अस म्हण्ता . तर मग मला पुतळ्या करायला हव."
" अग पण ऐकून तरी घे." ते काय न्हाई मला पुतळ्या करयला हवय. "
" पिक चांगल आलय खरकी पण त्या सवकाराचे साठ रुपये फेडायला नग का आणि बी बियाणाची खरेदी नको का करायला ' थोडा विचार करतो आणि म्हणतो " कारभारणे ऐक मी काय म्हणतो ते
" म्हम्बईला जाण्याचा बेत मी ग केला " " अगबाई , ते वो कशाला? "
" रोजगार क्रून साठवीन पै पैशाला " " मग मी पण तुमच्यासंग म्हम्बईला येनार"
" पुतळ्या मग करीन माझ्या सजनीला ग." " माला नग पुतळ्या मी तुम्हासंग येनारच."
" अग माझ घरदार तू सम्म्हाळून राही ग धरला वनवास पैश्याच्या पाई
धरला वनवास पैश्याच्या पाईग. आ .. आ... आ... आ... आ आ ... आ.. आ
=====
" कारभारी गेल म्हम्बईला एक मैना दीड झाला. .....
बाजारात गेल खुशालीचा खागुद न्हाई आला.....
शिर्प्या सारखा रडतो काय सांगू त्येला .....
घडि घडी सख्याची ..सई येती मला....
कुठ बसत असल , कुठ रहात असल,....
कुठ हिंडत असल, कुठ जेवत असल....
हाल होतात पोटाचे काई ग ....
धरला वनवास पैश्याच्या पाई...
धरला वनवास पैश्याच्या पाई ग. ... आ$$ आ... आ.... आ... आ..आ..आ..आ.... आ"
" शिर्प्या, मैने, कोण घरात न्हाई व्हय? ' ' अगबाई, किस्न्या, तू कवा आला म्हणाला? "
"ह्यो आत्ताच येतोय न्हव का ?' ' अन्, म्हाझ कारभारीरे? "
" त्यो व्हय, तकडच बसलाय म्हुम्बईत रोजगार करून साठवायला. ते काय न्हव बघ . अग ती मोठमोथ्ठी
घर बघितलीस न्हव ? आणि ती वकीलांची? कस खोर्यानी पैसे ओढतात. अग जिकड बघाव तिकड लिवणार्यांचीच कारवाई, बघ."
"अस म्हणतोस? ऐक तर......
अर लिवणार्यांची सारी कारवाई , कारवाई,.. गोर्या गरीबांचा वारी कोणी न्हाई.. र.. न्हाई...
कवी मानवताचे बोल .. खरे त्यांचे बोल... एवढी विनंती, जाहिराती हाई रे हाई...
शिकल्यावाचून धडगत न्हाई..रे ... न्हाई..... आ.. आ... आ... आ... आ..आ.. आ आ आ.... "
=========== 0000000000 ========
ह्या श्रुतिकेची मजा अशी कि अमचे काका काकूला कारभारणी अशीच हाक मारू लागले . आणि काकू अशी लाजायची अम्हाला खूप मजा वाटायची.

लोड होत आहे...