माझ्या वर्ग मैत्रिणीत बर्याच मुली गाणे छान म्हणायच्या .लीला कुलकर्णे नावाची एक मैत्रीण. तिचा आवाज फार छान गोड व मधुर असायचा जेव्हा आम्हाला मोकळा वेळ मिळे तेव्हा आम्ही तिला गायला सान्गत असे व ती लगेच म्हणत असे तशी तिने म्हन्टलेली काही गाणी आठवतात . एक गाण राधा कन्हैयाची वाट पाहाते ह्यावर आहे मला आवडल ते मी लिहिते.
वाटा पाहाते राधा बाला.
-------------------
वाट पाहाते राधा बाला कन्हैया गोकुळी चला
कन्हैया आ आ आ आ
अधिर जाहली जनता सारी .... बावरली राधिका मंदिरी ...
उभी ठाकली .. कैसी दारी.... वाट पाहाते राधा बाला ....
सोडुनी गोकुळाला .... साहवेना विरह राधिकेला
शिणविता का नंद लाला .. कन्हैया चला गोकुळी चला ....
कन्हैया आ आ आ आ वाट पाहाते राधा बाला ..... कन्हैया गोकुळी चला. |||
======== 0000000 =====
अशी लहान लहान गाणी ती म्हणायची. . आणखी एक असच गाण ...
रुसला का माधव राधिके....
-----------------------
रुसला का माधव राधिके तुजलाच गडे गुज ठाउके ... रुसला का माधव
किती रानी वनी गेही धूंडिले.. ... गवसेना कान्हा मन गोंधळे ....
ध्यानी मनी हा सदा पूजिले रुसला का माधव राधिके.. |||
***********
**8
लोड होत आहे...
प्रतिसाद