आम्ही बिजपुरात असताना आमच्या शालेत सुभद्रा नावाची एक मुलगी होती ती फार हुशार होतीच अभ्यासात शिवाय पोहणे, सायकल चालविणे वगैरे शर्यतीत भाग घेत असे आणि बक्शीस पण मिलवत असे. शाळेच्या सांस्क्रुतिक कार्यक्रमातही भाग घेत असे. तिने हे एक गुराख्याच गाण गुराख्याचा वेश घालून इतक छान म्हणून अक्टिंग केलन कि मला ते फार आवडल आणि छान आठवत. पुढे मी शिक्शिका झाले तेव्हा ते मी माझ्या काही विद्यार्थ्याना शिकविले व शाळेच्या कार्यक्रमात करऊन घेतल. ते गाणे असे आहे ...
ग़ुराखी
-------------
अहो मी गुराखी आलो , गुरे घेऊन चाराया ...
माझी रत्नी गाय .. नवी व्याली हाय ...
तिच दुध लयी गोड प्याया .... अहो मी गुराखी आलो .....
राना वना मधुन ... काट्या कुट्या मधुन .....
काटे कुटे बोचत लयी पाया .... अहो मी गोराखी आलो......
ढवळ्या पोवळ्या बैला , तुम्ही कोठे गेला ??? ...
जिव दमला तुम्हा शोधाया..... अहो मी गुराखी आलो
अहो मी गुराखी आलो गुरे घेऊन चाराया.
======== ++++++ =======
असे होते ते गाणे. .
लोड होत आहे...