Welcome, Guest   [ Register | Sign In | Take a tour | Adult Filter: On ]

ऊठ गोपळजी

माझ्या भावंडापैकी कोणाच्या पाठ्य पुस्तकात 'ऊठ गोपाळजी" ही कविता होती हे आठवत नाही. पण पाठांतर करताना जोरजोरात करतो . त्यामुले ती कविता सर्वाना पाठ होत असे. माझ्या आईलासुधा ती कविता येत असे. कोणतीही कविता कोणाच्याही पाठ्य पुस्तकात असली तरी ती सर्वाना पाठ होत असे. तशीच ही कविता मला आठवली . मला ती फार आवडली. त्याची चालपण छान आहे.
ऊठ गोपाळजी
--------------------------------------
ऊठ गोपाळजी, जाई धेनूकडे ,
पाहती सौंगडे , वाट तूझी ....
लोपली हे निशी, मंद झाला शशी
मुनी जन मानसी ध्याती तुजला ||
भानु उदयाचळी , तेज पुंजाळ्ले ..
विकसती कमळे, जळामाजी.. ||
धेनु वत्से तुला , बाहती माधवा ,
ऊठ गा यादवा, उशिर झाला. ||
ऊठ पुरुशोत्तमा , वाट पाहे रमा..
दावि मुख चंद्रमा, सकळीकासी ..||
कनक पात्रांतरी , दीप रत्ने बरी ...
ओवाळती सुंदरी, तूज लागी ..||
ऐक बा श्रीहरी, बोलती वैखरी....
ऊठ गा श्रीहरी , मायबापा ...||
========= 0000000 =======
छान आहे ना ? श्रीक्रुष्णा वरची सगळी गाणी मला छानच वाटतात .







नकार