एक तामिळ गाणे माझ्या ताईने शिकविले होते. सम्वाद मजेदार वाटला म्हणून लिहावे असे वाटले. तो सम्वाद असा आहे. कृष्ण गुराना यमुनेच्या काठी चरायला घेऊन जातो तेव्हा यशोदा त्याला सांगते :- बाळा तू गुराना चरायला उनात जाऊ नकोस . मी तुला दूध लोणी देते तू जाऊ नकोस
तेव्हा कृष्ण म्हणतो :-- मला गेलच पाहिजे आई तू मला आडऊ नकोस्. मला दूध लोणी काही नको मी गुराना चारऊन आनंदाने धावत पळत येईन
मग यशोदा म्हणते:- नाहिरे बाळा यमुना किनारी नेहमी चोरांची भीती असते. त्यांना पाहून तू भयभीत होशील व थर थर कापशील्. ..म्हणून म्हणते तू जाऊ नकोस्.
कृष्ण म्हणतो:- चोरावर मोर माझ्या सारखा कोणी आहे का साँग ना ग आई...ते आले म्हणजे मी त्यांना मारून त्यांचे तुकडे तुकडे करुन टाकीन्.
तर यशोदा म्हणते... अरे पण नंद गोपालानी बाळ कुठे आहे म्हणून विचरल्यास मी त्यांना काय
सांगू रे माझ्या बाळा.
क्रुष्ण म्हणतो राजांना म्हणव कि बाळ आपल्या सवंगड्या बरोबर गल्लीत खेळायला गेला आहे. आणि शोधा शोध करे पर्यंत मी धावत पळत येईनच..
असा हा सम्वाद तामिळ मध्ये आहे . ते मी आता तामिळ गाणे लिहिते...
यशोदा:.. माड्मेक्य कण्णे नी पोघ वेंडाम शोन्नेन्...
काचीन पाल तरेन , कलकण्ड चीनियुम तरेन्.
कैयिल वेण्णै उरुटि तरेन्, वैयिलिले पोघ वेंडाम्. ....
..माडमेक्य कण्णे.....नी पोघ वेंडाम शोन्नेन्......
क्रुष्ण्..:- पोघ वेंडुम ताये, तडै शोल्लादे नीये...
काचीन पालुम वेंडाम , कलकंण्ड जीनियुम वंडाम्..
उल्हासमाय माड मेय्त ओडि नोडी वंदुडुवेन.... पोघ वेंडुम ताये....
यशोदा: - यमुना नदी करैयिल ,एप्पोदुम कळ्ळर भयम्,
कळ्ळर्गळै कंडैयानाल , कलंगिडुवाय कण्मणिये....
क्रुष्ण्: कळ्ळ्नुकु कळ्ळन उंडो, येनैपोलै शोल्लुम अम्मा
कळ्ळ्रर वंदु अॅनी अडिताल्, कन्डु तुंडु शैदुडुवेन्.....
यशोदा: पक्श्मुळ्ळ नंद गोपर्, बालन येंगे एंन्र केटाल्,...
नान एन्न बदल शोल्लुवेन्, एन्नुडैय कण्मणिये.....
क्रुष्ण्: बालर्गळोडु विधियिले, पंदाडुघिरेन येंन्र शोल्लु
तेडी आवर वरुमुन्ने ,ओडिनोडियिल वंदुडुवेन्.......|||
=================================
हे गाणे कर्नाटक संगीतात बरच प्रसिद्ध आहे. त्याची चाल पण छान आहे त्यामुळे म्हणायला सोपे वाटते.
.
लोड होत आहे...