पडू आजारी... मौज हीच वाटे भारी.
.............................
ही कविता माझी धाकटी बहीण पाठ करते...पडू आजारी.. पडू आजारी.. कविता पुढे जाई ना ...वडील म्हणतात... "अग पुढे काय?" शेवटी कविता पूर्ण झाली.. ती अशी..
पडू आजारी.
................
पडू आजारी..... मौज हीच वाटे भारी....
लागेल न जावे शाळेला,
किंबहूना होतील सेवला,
तत्पर सारी.... मौज हीच वाटे भारी...
पडू आजारी मौज हीच वाटे भारी.
खडिसाखर, मनुका, बेदाणा,
संत्री, साखर, लिंबू आणा ...
जा, बाजारी... मौज हीच वाटे भारी...
पडू आजारी, मौज हीच वाटे भारी.
=============
ही कविता आठवण होण्याच कारण.... मी हल्लीच थोड्या दिवसापूर्वी आजारी पडले आणि
कवितेत म्हंटल्या प्रमाणे मला मौज वाटाळी.सेवेसी सारी तत्पर होती. मी खरोखरच मौज लुटली.
आम्ही कोणीही आजारी पडलो म्हणजे ह्या कवितेचा उल्लेख होतोच.म्हणून ह्या कवितेची मजा वाटले
लोड होत आहे...