मी शारदा. सध्या माझं वय 83 हून अधिक आहे. मी लहाणपणी विजापुरांत शिकलेली काहीं गाणी आठवतात. ती लिहीण्याचा मी प्रयत्न करत आहे.. माझे वडील संगीतज्ञ होते. आपल्या मुलाना पण संगीताच ज्ञान मिळाव अशी त्यांची इच्छा त्यामुळे आम्हाला संगीत शिकविण्या करिता घरीच मास्तर येत होते. गावात कोणताही संगीताचा कर्यक्रम असला तर तिथे माझे वडील जात असत. कधी कधी आमच्या घरी सुद्धा प्रोग्राम होत असत. आम्ही लहान असताना आम्हाला कळो किवा न कळो पण आमचे वडील आम्हाला मोठ मोठ्या गाण्याच्या मैफिलिला नेत असत. उदा;-उस्ताद बडे गुलाम अलि खान , उस्ताद अब्दुल करीम खान , हिराबाई बडोदेकर ह्यांच्या मैफिलिला जायला मिळाले. तेव्हा रात्रभर मैफिली चालत असत. मध्यंतरी आमची एक झोप सुद्धा होत असे. आता मला त्याचा उपयोग होतो आहे.
| पोर्टल निर्माता | sharada Chellam |
| शेवटी सुधारित | जून 7, 2009 10:35:09 AM IST |